गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा कट उधळला ; पुरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य जप्त

1776

– नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई
Ther गडविश्व
गडचिरोली, ५ ऑगस्ट : २८ जुलै ते ०३ ऑगस्ट या कालावधीत नक्षल्यांकडून पाळण्यात येणाऱ्या नक्षल सप्ताह सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाने कुरखेडा उपविभाग अंतर्गत येत असलेल्या पोलीस मदत केंद्र कोटगुल हद्दीमध्ये हेटळकसा जंगल परिसरात कोरची एलओएस, टिपागड एलओएस व कंपनी क्र. ०४ च्या नक्षल्यांनी मोठ्या घातपाताच्या उद्देशाने पुरून ठेवलेले स्फोटक साहीत्य जप्त जब्त करून नक्षल्यांचा मोठा घातपाताचा कट उधळून लावला आहे. या कारवाईने नक्षली संघटनेला मोठा हादरा बसला आहे.
२८ जुलै ते ०३ ऑगस्ट या नक्षल शहीद सप्ताहादरम्यान नक्षलवाद्यांकडून नक्षल सप्ताह पाळण्यात येतो. सदर नक्षल सप्ताहमध्ये नक्षलवादी विविध शासनविरोधी घातपाती हिंसक कारवाया करीत असतात. यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात. असे साहित्य ते मोठया प्रमाणात खरेदी करुन जंगल परिसरात जमिनीमध्ये गोपनियरित्या पुरुन ठेवतात. तसेच काही ठिकाणी सुरक्षा बलांना धोका होवू शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारुगोळा इत्यादी ते गोपनियरित्या जमिनीत पुरुन ठेवतात.०४ ऑगस्ट २०२२ रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें कोटगुल हद्दीमध्ये हेटळकसा जंगल परिसरात कोरची एलओएस, टिपागड एलओएस व कंपनी क्र. ०४ च्या नक्षल्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याचे उद्देशाने, मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा. यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी अभियान राबविण्याची योजना आखण्यात आली. सदर योजनेनुसार विशेष अभियान पथक गडचिरोली, सिआरपीएफ १९२ बटालियनचे यंग प्लॉ जवान व बी. डी. डी. एस. पथकाचे जवान हेटळकसा जंगल परिसरामध्ये नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून एका संशयीत ठिकाणी ठेवलेले स्फोटके व इतर साहित्य शोधुन काढण्यात जवानांना खुप मोठे यश आले आहे.
सदर डंप हे पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या मोठ्या टाकीमध्ये लपवून पुरून ठेवण्यात आले होते. यामध्ये २ नग कुकर त्यापैकी स्फोटकांनी एक भरलेला, ०४ नग. कार रिमोट, ०३ नग वायर बंडल, ०८ पॉकेट डिस्टेंबर कलर, पिवळ्या रंगाचा पावडर अंदाजे ०१ कि.ग्रॅ., राखडी रंगाचा पावडर अंदाजे ०२ कि. ग्रॅ., पांढऱ्या रंगाचा पावडर अंदाजे १ पाव, पांढरा दाणेदार पदार्थ अंदाजे ५० कि.ग्रॅ., ०२ नक्षल पुस्तके, ०१ नग प्लास्टीकची पाणी साठविण्याची टाकी ५०० लिटर क्षमतेची वरील सर्व स्फोटक साहित्य याच टाकीमध्ये साठवून ठेवण्यात आलेले नक्षल साहित्य हस्तगत करुन, घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली. यात ०२ नग कुकरपैकी स्फोटकांनी भरलेला ०१ नग कुकर हे बीडीडीएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले असून, इतर साहीत्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कारवाई सुरु आहे.

 

२८ जुलै ते ०३ ऑगस्ट या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर सदर डंप हस्तगत केल्यामुळे या भागात नक्षलवादयांना मोठा हादरा बसलेला आहे. त्यामुळे नक्षल्यांचे लक्षात आलेले आहे की, गडचिरोली पोलीस दलाची नजर नक्षल्यांवर असुन, सामान्य नागरीकांना वेठीस धरुन बळजबरीने नक्षल सप्ताह पाळावयास भाग पाडणे नक्षलवादयांना आता अडचणीचे ठरणार आहे.
सदर कामगिरीबद्दलपोलीस अधीक्षक अंकित गोयल सां. यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक गडचिरोली, सिआरपीएफ १९२ बटालियनचे यंग प्लॉटुनचे जवान व बी. डी. डी. एस. पथकाचे कौतुक केले आहे. तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगितले असून, नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here