– जमिनीत पुरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य हस्तगत करण्यास गडचिरोली पोलीस दलास यश
The गडविश्व
गडचिरोली, १२ ऑक्टोबर : उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें मालेवाडा हद्दीमध्ये ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०० वाजता लड्डुडेरा (हेटळकसा) जंगल परिसरात नक्षल्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने, मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोली व बी.डी.डी.एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना एका संशयीत ठिकाणी लपवुन ठेवलेले स्फोटके व इतर साहित्य शोधुन काढण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश आले आहे.
शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी नक्षल विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षल्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतरप्रसंगी केला जातो.
#गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांचा मोठा घातपाताचा कट उधळला
– जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य केले जप्त#Gadchiroli #gadchirolipolice pic.twitter.com/8tHhU6GoDb— THE GADVISHVA (@gadvishva) October 12, 2022