The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या इरपणार येथे नक्षल्यांनी वाहनांची जाळपोळ केल्याची घटना आज 21 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडल्याची माहीती समोर येत आहे. जाळपोळ करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ९ ट्रक्टर, 2 जेसीबी व एक ग्रेडर मशीनचा समावेश आहे.
इरपणार ते पेनगुंडा मार्गावर रास्ता बांधकाम सुरु आहे. दरम्यान नक्षल्यांनी आज २१ जानेवारी रोजी भरदिवसा दुपारी २ वाजताच्या सुमारास रस्ता बांधकामावरील वाहने जाळली. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.