– भामरागड तालुक्यातील घटना
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंदांतर्गत येत असलेल्या विसामुंडी गावानजीकच्या नाल्यावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावरील वाहनांची नक्षल्यांनी बुधवारी रात्रोच्या सुमारास जाळपोळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच यावेळी बांधकामाजवळ असलेल्या वाहन चालक व मजुराला मारहाण केल्याची माहिती आहे. या घटनेतत नक्षल्यांनी ५ वाहनांची जलपोळ केली आहे.यामुळे संबंधित कंत्राटदाराने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मारहाण झालेल्यांमध्ये पवन लसमय्या रतपल्लीवार रा. येचली, ता. भामरागड, रघुपती बापू नैताम रा. जिंजगाव, ता. भामरागड आणि शंकर फागू राणा रा.ओरपरता (झारखंड) यांचा समावेश आहे.
भामरागड तालुक्यातील विसामुंडी नजीक नाल्यावर पुलाचे काम सुरू आहे. बांधकाम ठिकाणी बुधवारी रात्रोच्या सुमारास काही नक्षली आले आणि चालकांना झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी उठण्यास वेळ केल्यानंतर नक्षल्यांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे. व त्यानंतर त्या कामावर असलेला एक जेसीबी, एक पोकलॅन, दोन ट्रॅक्टर आणि एक दुचाकीची नक्षल्यांनी जाळपोळ केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे.