The गडविश्व
गडचिरोली : २७ सदस्यसंख्या असलेल्या गडचिरोली नगर परिषदेच्या आगामी २०२२ च्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सदस्यांच्या आरक्षणाची सोडत आज १३ जून रोजी नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी बालकांच्या हस्ते ईश्वरचिट्ठीने आरक्षण सोडत काढण्यात आली.
यावेळी आरक्षण सोडतीसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अंकित यांनी प्रधिकृत अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच यावेळी मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी भांडारवार, कार्यालयीन कमर्चारी, पत्रकार, नागरिक, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
गडचिरोली नगर परिषदेची सदस्यसंख्या २७ असून त्यापैकी १४ जागा ह्या महिलांसाठी राखीव आहे त्यापैकी १० जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी दोन अनुसूचित जाती आणि दोन जागा अनुचूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राहणार आहेत.
सदर आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना १५ ते २१ जून २०२२ पर्यंत मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर करता येणार आहे.
प्रभागानिहाय आरक्षण सोडत
प्रभाग क्रमांक १ – सर्वसाधारण एससी (SC) आणि सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक २ – सर्वसाधारण एसटी (ST) आणि सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ३ – सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक ४ – एसटी(ST) महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक ५ – एससी(SC) महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक ६ – सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक ७ – सर्वसाधारण एससी (SC) आणि सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ८ – सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक ९ – सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक १० – सर्वसाधारण एसटी (ST) आणि सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ११ – एसटी (ST) महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक १२ – सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक १३ – एससी (SC) महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला/ पुरुष