गडचिरोली नगर परिषदेमार्फत देण्यात आलेल्या तिरंगा ध्वजात अनेक चुका : हा अपमान नाही काय ?

15728

– साहेब, सांगा कसा मी तिरंगा लावू आपल्या घरी…. ‘हर घर तिरंगा मोहीम’

The गडविश्व
गडचिरोली, १२ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वमूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण देशभर साजरा होत आहे. जनसामान्यांमधे देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी रहावी यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा (Har ghar tiranga) मोहिम राबविण्यात येत आहे.
गडचिरोली नगर परिषदेमार्फत घरो घरी तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात येत आहे. मात्र सदर ध्वजात अनेक चुका पहावयास मिळत असल्याने हा अपमान नाही आहे का ? असा सवाल उपस्थित होत असून आपल्या घरावर हा तिरंगा ध्वज लावायचा तरी कसा ? असाही सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील नगर परिषद, ग्रामपंचायत, नगरपंचायतींना तिरंगा ध्वज वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र या ध्वजात विविध चुका दिसून येत आहेत त्यामुळे हा तिरंगा ध्वजाचा अपमान नाही काय ? नागरिकांनी असाच ध्वज आपल्या घरावर लावायचा काय ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

झेंडा तयार करताना तिरंगा ध्वजाचा आकार आयताकार असावा, तिरंगा ध्वजाची लांबी:रुंदी प्रमाण हे 3:2 असे असावे, तिंरगा बनविण्यासाठी खादी अथवा कॉटन, पॉलिस्टर, सिल्क कापडापासून बनविला जाऊ शकतो, झेंड्यामध्ये सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग असावा. मध्यभागी पांढऱ्या पट्टीवर २४ रेषांचे गोलाकार निळ्या रंगाचे अशोकचक्र असावे अशी काळजी घेण्यात येते.
मात्र वितरित करण्यात आलेल्या ध्वजात विविध चुका दिसून आल्या आहेत त्यामध्ये, ध्वजाचा आकार पाहिजे तसं दिसून येत नाही आहे, तसेच ध्वजातील तिन्ही रंग समान आकारात असणे आवश्यक आहे मात्र तसेही आढळून येत नाही आहे, पांढऱ्या पट्टीवर २४ रेषांचे गोलाकार रंगाचे अशोकचक्र मध्यभागी असणे आवश्यक असून ते एक बाजूच गेल्याचे दिसते आहे . ध्वज तयार करताना ओबड धोबड कटिंग करण्यात आली आहे.ध्वज तयार करण्याच्या कामात पूर्णतः निष्काळजीपण दिसून येत आहे , तसेच ध्वजावर डाग सुद्धा पडलेले दिसून आले त्यामुळे असा ध्वज आपल्या घरावर फडकवणे लावणे हा तिरंगा ध्वजाचा अपमान नाही का ? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत वितरित करणाऱ्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता प्रशासनामार्फत जसे ध्वजाचे वितरण करण्यात आले त्याप्रमाणे आमच्या मार्फत ध्वज वितरित करण्यात येत असल्याचे उत्तर मिळाले. मात्र या सर्व प्रकाराला जबाबदार कोण ? अशाप्रकारे ध्वजाचे वितरण करणे हा अपमान नाही काय ? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ध्वजाची तपासणी न करताच नागरिकांना ध्वज वितरित करण्याचे ठरविले काय ? चुकीचा ध्वज आपल्या घरावर लावणे अपमान नाही का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून या सर्व प्रकरणाची तात्काळ नगर परिषद प्रशासनाने दखल घेऊन अशा प्रकारचे ध्वज वितरित करण्याचे थांबवून अपमान होण्याचे थांबवावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

– आम्हाला जसे तिरंगा ध्वज पुरविण्यात आले त्याप्रमाणे आम्ही वितरित करीत आहोत, आम्हाला सुद्धा काही चूक निदर्शनास आले तसे तिरंगा ध्वज आमच्यावतीने बाजूला काढून ठेवण्यात येत आहे.
– विशाल वाघ
मुख्याधिकारी, नगर परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here