गडचिरोली : नाल्यात आढळला इसमाचा मृतदेह

1172

गडचिरोली तालुक्यातील घटना
The गडविश्व
गडचिरोली, १७ जुलै : जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या चांदाळा-माडेमूल जवळील नाल्यात इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना शनिवार १६ जुलै रोजी उघडकीस आली. मोहन वसाके (४५) रा. माडेमूल असे मृतकाचे नाव असल्याचे कळते.
प्राप्त माहितीनुसार, मोहन वसाके यांचे १४ जुलै रोजी घरात भांडण झाले व तेव्हापासून तो बेपत्ता असल्याचे कळते. कुटुंबातील व्यक्तींनी शोधाशोध घेतली असता कुठेही आढळून आला नाही. तसेच जिल्ह्यात मागील ८ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. माडेमूल नजीकच्या नाल्यालाही पूर होता. काल शनिवार १६ जुलै रोजी पूर ओसरताच दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मोहनचा मृतदेह अखेर नाल्यात आढळून आला. घटनेची माहिती लागलीच गडचिरोली पोलीस स्टेशन ला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मौका पंचनामा केला. मात्र मोहनने स्वतः नाल्यात उडी घेऊन आत्महत्या केली की नाला पार करत असतांना वाहून गेला याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. अधिक तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here