– आरोपी पतीचे पोलीसांसमोर आत्मसमर्पण, हत्येची दिली कबुली
The गडविश्व
गडचिरोली : जिल्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड ने मारून हत्या केल्याची घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. विद्या देविदास चौथाले (२४) रा.आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे मृतक पत्नीचे नाव आहे तर देविदास पुंजाराम चौथाले (२६) असे आरोपी पतीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, विद्या व देविदास यांचा दोन वर्षापूर्वी आंतरजातीय विवाह झाला असल्याचे कळते. दोघांचा सुखी संसार चालत असतांना अचानक आरोपी पती देविदास याने रागाच्या भरात पत्नी विद्या हिच्या डोक्यात लोखंडी रॉड ने मारहाण केली यात विद्या हिचा मृत्यू झाला. घरगुती भांडणातून ही हत्या झाल्याचे बोलल्या जात आहे. हत्या केल्यानंतर आरोपी पती देविदास यांने आष्टी पोलीस ठाणे गाठून आपण हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी पती अटकेत असून पोलीस घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.