गडचिरोली : पत्नीला जीवे ठार मारणाऱ्या आरोपीला जन्मठेप

869

– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, २१ सप्टेंबर : पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनी आज २२ सप्टेंबर २०२२ रोजी ठोठावली आहे. प्राणवल्लभ राधाकांत राजवंशी (४७) रा.पी.व्ही. २६ मायापूर ता.पाखांजूर जि.कांकेर छत्तीसगड असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक कल्पना व आरोपी प्राणवल्लभ या दोघांचे दुसरा विवाह झाला होता. मृतक कल्पनांचे पाहिल्या लग्नापासून एक मुलगा आणि प्राणवल्लभ यांचे पासून झालेला एक मुलगा असे चार जण एकत्र राहत होते. हे चारही जण डिसेंबर २०१२ मध्ये देऊळगाव ता.आरमोरी जि.गडचिरोली येथील भाऊराव दहिकर यांच्या शेतामध्ये टरबूज उत्पन्न काढण्याचे काम करीत तिथेच राहत होते. दरम्यान ८ एप्रिल २०१३ रोजी भाऊराव दहिकार यांच्या शेताजवळील तुळशीराम शेंडे यांच्या शेतातील तणसीच्या ढिगाजवळ एका महिलेचा सांगाडा पडलेला आहे व सदर मृतदेह कल्पना ही एक महिन्यापासून बेपत्ता आहे तिचे असावे असा संशय वरून पोलीस स्टेशन आरमोरी येथे नरेंद्र बनपूरकर यांनी दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद करून गुन्हा दाखल करीत तपास सपोनी रवींद्र डी.पाटील यांनी हाती घेतला.
दरम्यान या वेळी मनोहर बिस्वास याने सदर मृतदेह हा आपली बहीण कल्पनाचा असू शकतो तसेच मृतदेहाचे फोटो दाखविले असता मृतदेह बहीण कल्पनाच असल्याचे सांगितले. बहीण कल्पना व तिचा पती यांचा दोघांचाही हा दुसरा विवाह होता प्राणवल्लभ व बहीण कल्पना यांचे दुचाकी खरेदी माझे नावावर का खरेदी केली नाही ? तसेच कल्पना हिचे चरित्रावर संशय घेत होता कल्पना हिचे मृत्यूपासुन प्राणवल्लभ याचा मोबाईल बंद येत आहे व तो गावी परत देखील आलेला नाही व आमच्याशी संपर्क देखील साधलेला नाही. म्हणून प्राणवल्लभ राधाकान्त राजवंशी यानेच माझी बहीण कल्पना यास जिवानिशी ठार मारुन तीचा मृतदेह तणसाचे ढिगात लपवून पळुन गेलेला आहे. अशा तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन तपासात घेतला.
तपासादरम्यान मार्च २०१३ मध्ये भाउराव दहीकर चे शेतात झोपडी मध्ये यातील आरोपी व त्याची पत्नी कल्पना सोबत असतांना रात्री ८.०० ते ८.३० दरम्यान आरोपी प्राणवल्लभ राधाकान्त राजवंशी यांनी त्याचे पत्नी मृतक कल्पना हिच्याशी झगडा भांडण करुन नायलॉन रस्सीने तिचा गळा आवळुन खून केला व प्रेत तणशिच्या ढिगाऱ्यात लपवुन ठेवला. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आज २२ सप्टेंबर रोजी आरोपी प्राणवल्लभ राधाकान्त राजवंशी याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल गडचिरोली यांनी कलम ३०२ भादवी मध्ये आजन्म कारावास व १० हजार रुपये दंड तसेच कलम २०१ भादवी मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्ह्याचा तपास पोनि महेश पाटील यांनी केला. सदर प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधून प्रकरणाची निर्गती करिता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here