The गडविश्व
गडचिरोली : भारतीय स्वात्रंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असून त्या पार्श्वभूमीवर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्याने पोलीस स्टेशन गडचिरोलीच्या वतीने शासकीय आदिवासी इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, सेमाना रोड गडचिरोली येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज ४ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाला महिला सपोनि पुनम गोरे, महिला पोउपनि बांबोळे तसेच महिला व बालविकास विभाग गडचिरोली येािील भांडारवार, शेंडे यांनी मुलीच्या सुरक्षीततेबाबत, सध्या घडत असलेल्या साइबर क्राईम, अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम, रस्ता सुरक्षा इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच पोलीसांकडे असलेले हत्यारे एके 47, एस.एल.आर, 9 एम.एम. पिस्टल इत्यादी हत्यारांसंबधी माहिती देवून जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला वर्ग ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
