The गडविश्व
गडचिरोली : पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन व पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतून ‘वीर बाबुराव शेडमाके भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी’ पोलीस मुख्यालय मैदानावरील वीर शहीद पांडु आलाम या सभागृहात सुरु आहे. या स्पर्धेचे उद्घाटन काल ८ एप्रिल २०२२ रोजी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., यु मुंबाचे टिम लिडर संदिप सिंह, यु-मुंबा संघाचे उत्कृष्ट खेळाडू अभिषेक सिंह, उप विभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा यांचे हस्ते पार पडले. उद्घाटनीय सामन्यासह ०६ सामने काल पार पडले. यात गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम भागातील १० संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यामधुन उपांत्य फेरीत कुरखेडा, धानोरा, हेडरी, भामरागड हे संघ पोहचले आहेत.
विजयी झालेले ०४ संघ हे आज ०९ एप्रिल २०२२ रोजी उपान्त्य व अंतिम फेरीसाठी खेळणार असुन आज ठिक ४.०० वा. सुरु होणारे हे कबड्डी सामने प्रेक्षकांना गडचिरोली पोलीस दलाच्या यु-ट्युबच्या SP Gadchiroli Police या चॅनलवरील https://youtube.com/channel/UCmd6To5TbsfeCLJ3-BrbdBw या लिंकवर थेट प्रक्षेपणाद्वारे पाहता येतील. या उपांत्य लढती अनुक्रमे कुरखेडा विरुध्द धानोरा व हेडरी विरुध्द भामरागड असे खेळल्या जाणार आहेत. या कबड्डी सामन्यांचा आनंद थेट प्रक्षेपणाद्वारे घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी केले आहे.