The गडविश्व
गडचिरोली : येथील पोलीस वसाहतीत राहत असलेल्या महिला पोलीस शिपाईने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. प्रणाली काटकर (३५ ) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस शिपाईचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक महिला शिपाई हे गडचिरोली मुख्यालयात कार्यरत होत्या. त्यांचे लग्न पोलीस शिपाई सोबतच झाले असून पती सुद्धा गडचिरोली मुख्यालयात कार्यरत आहे. मृतक महिला शिपाई हे पोलीस शिपाई यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. दोघात सातत्याने वाद होत असे अशी माहिती आहे. काल २९ जानेवारी रोजी रात्रोच्या सुमारास कौटुंबिक वाद झाला. वाद विकोपाल गेल्याने महिला पोलीस शिपाईने टोकाची भूमिका घेत विष प्राशन केले. याबाबत पतीला लक्षात येताच त्यांनी लगेच उपचाराकरिता शासकीय रुग्णायालात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी महिला पोलीस शिपाई प्रणाली काटकर यांना मृत घोषित केले. सदर महिला पोलीस शिपाईने आत्महत्या केल्याने पोलीस वसाहतीत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.