गडचिरोली महिला व बाल रुग्णालयात बालकांच्या ‘डोळे तपासणी’ शिबिराचे आयोजन

287

The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) , १५ सप्टेंबर : जिल्ह्यात डीईआईसी व आरबीएसके द्वारा जिल्हा महिला व बाल रुग्णालयात डीईआईसी येथे बालकांच्या ‘डोळ्यांचे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात बालकांच्या तपासणी करिता द्वितीय स्तरीय संदर्भसेवा कक्ष म्हणून डीईआईसी (DEIC) जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे स्थापित असून या डीईआईसी मध्ये ० ते १८ वर्षे वयोगटातील 4D’s तपासणीनुसार आढळलेली बालके व विद्यार्थी यांना संदर्भसेवा दिली जाते.
यामध्ये आरबीएसके पथकांकडून अंगणवाडी, शाळा, आश्रमशाळा तपासणीतील तसेच SNCU, NRC, PNC ward, Pediatric ward, आणि तालुकास्तरावरून PHC, ASHA, RH, SDH इत्यादी मधील बालके / विद्यार्थी यांना डीईआईसी येथे नोंदणी व निदान निश्चिती करिता तपासणी, गरजेप्रमाणे डीईआईसीतील उपलब्ध थेरेपी व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेकरिता तृतीय स्तरावर संदर्भित केले जातात.
डीईआईसी-आरबीएसके तर्फे १० सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे तसेच जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकारी डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली डीईआईसी येथे ‘जन्मजात डोळ्यांचे तपासणी शिबीर’ आयोजित करण्यात आले. तपासणी करीता सुरज नेत्रालय नागपूर येथील तज्ञ डॉ. प्रभात नांगिया व चमू उपस्थित झाले आहेत.
या शिबीरादरम्यान Surgical 85, Higher Evaluation 27, Non surgical १५ असे एकूण १२७ बालके / विद्यार्थी यांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली. या बालकांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनानुसार शस्त्रक्रियेकरिता तृतीय स्तरावर संदर्भसेवा देण्याकरिता डीईआईसी तर्फे नियोजन होणार आहे.
सदर शिबिर यशस्वितेसाठी डीईआईसी व्यवस्थापक प्रशांत खोब्रागडे, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक हेमलता सांगोडे, डीईआईसी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव मांडवे, गोपाल पेंदाम, अश्विनी दर्शनवार, निखिल सालवटकर, शीतल देवावार, अक्षय तिवाडे इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here