The गडविश्व
गडचिरोली, ९ नोव्हेंबर : शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मीनाबाजारातील ब्रेकडान्स वर दुर्घटना घडल्याने एक युवती जखमी झाल्याची घटना आज बुधवार ९ नोव्हेंबर रोजी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मीनाबाजार तात्काळ बंद करण्यात आला.
मात्र सदर घटनेने मीनाबाजार परिसरात गोंधळ उडाला होता. दरम्यान या घटनेत युवतीला जखम झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून तिला तात्काळ रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. घटनेची माहिती पोलीसांना कळताच तात्काळ पोलीस मीनाबाजार स्थळी दाखल झाले होते.
यापूर्वीही या मीनाबाजारात लहान मुलांच्या जम्पिंग जपांग करणारा एअर बलून फुटल्याने काही मुलं जखमी झाले होते. सदर मीनाबाजारमध्ये अशाप्रकारच्या घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले असून मीनाबाजार मध्ये येणाऱ्या साहित्यांची फिटनेस तपासली गेली होती की नाही असा प्रश्नही नागरिक करीत आहे. या पूर्वीच घडलेल्या घटनेने पोलिसांनी सर्व सामान व्यवस्थित ठेवावे अशी ताकीद दिली होती मात्र आता पुन्हा घटना घडल्याने पोलीस काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. भविष्यात पुन्हा अशी घटना होऊ नये याबाबत दखल घेणे मीनाबाजार आयोजकांना आवश्यकता आहे. ©©©
#gadchirolinews #gadchiroli #mela #gadchirolimela #chandrpur rod