गडचिरोली-मूल मार्गावर सावली जवळ कारने घेतली पेट

887

– अपघात एक इसम ठार 

The गडविश्व
सावली : स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका इलेक्ट्रिक खांबाला धडक दिल्याने एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना आज गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान घडली.
गडचिरोली-मूल मार्गावरील सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या बाजुला असलेल्या एका इलेक्ट्रिक खांबाला मूलकडे जाणाऱ्या कारने धडक दिल्याने, कारला आग लागल्याची शंका वर्तविली जात आहे, सदर आगीमुळे कारमधुन सर्वत्र धुर पसरायला सुरूवात झाली, सदर वाहनाच्या काही अंतरावर देवीलाल यादव (३५) वर्षे रा. कांकेर छत्तीसगड यांचे मृत्तदेह आढळुन आले आहे.
घटनेची माहिती होताच घटनास्थळावर पोलीस निरीक्षक आशिष बोरकर व पोलीस पथक दाखल झाले, अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत सावली पोलीस अधिक तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here