– वेळापत्रक जारी
The गडविश्व
गडचिरोली, २४ सप्टेंबर : दक्षिण पुर्व मध्य रेल्वे अंतर्गत येत असलेल्या नागपूर झोन मधील गोंदिया-वडसा-चांदापोर्ट मार्गावर धावणारी पॅसेंजर रेल्वे आता ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर पासून धावणार आहे. यामुळे आता प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. तसे पत्रकही २१ सप्टेंबर ला जारी करण्यात आले आहे.
कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या नव्हत्या. सदर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी होत होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन पुन्हा या रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून या संदर्भात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूरचे उपायुक्त अवधेश त्रिवेदी यांनी २१ सप्टेंबरला ला पत्र जारी केले आहे.
त्यानुसार गोंदिया-वडसा स्पेशल पॅसेंजरी ही रेल्वे गाडी ३० सप्टेंबर पासून गोंदिया रेल्वेस्थानकावरुन सायकांळी ०७ : १० वाजता (१९: १० पीएम) सुटणार तर वडसा येथे रात्रीला ०९ : ३० (२१ :३०) वाजता पोहचणार आहे. तर १ ऑक्टोबर पासून वडसा- चांदापोर्ट ही रेल्वेगाडी वडसा रेल्वेस्थानकावरुन सकाळी ७.१५ वाजता सुटेल व चांदापोर्टला ९:५५ ला पोहचनार. तर चांदापोर्ट-गोंदिया ही रेल्वेगाडी १ आँक्टोंबरपासून चांदापोर्ट रेलवे स्थानकावरुन सकाळी १०: २० वाजता सुटणार असून गोंदियाला सायकांळी ४:०० वाजता पोचणार आहे.