The गडविश्व
गडचिरोली, १६ नोव्हेंबर : आदिवासी परधान समाज मंदिर, गडचिरोली येथे १५ नोव्हेंबर २०२२ ला धरती आबा, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बिरसा मुंडा यांनी दिलेल्या जल, जमीन, जंगलाचा लढा आणि आदिवासी समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. ब्रिटिश सरकारच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध, सर्वसामान्य जनतेला दुर्बल घटकांना सोबत घेऊन एका नव्या क्रांतीची सुरवात करणारा महान योध्दा, क्रांतिकारक, लोकनायक, बिरसा मुंडा असा आदर व्यक्त करून अभिवादन करण्यात आले.
यावेळेस उपस्थित समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी, सचिव नरेंद्र शेडमाके, कोषाध्यक्ष अनिल कन्नाके, महेंद्र सिडाम, ज्येष्ठ नागरीक उद्धव कुळमेथे, मानसिंग सुरपाम, भालचंद्र सलामे, भगवान कोडापे, युवा सदस्य महेंद्र मसराम, अजय सुरपाम, रोहित अत्राम, जितू सलामे, विवेक वाकडे, आकाश कुळमेथे, साहिल शेडमाके, नितीन शेडमाके, अंकुश बारसागडे, सुधिर मसराम, नेहाल मेश्राम, राज डोंगरे, महादेव कांबळे, संजय डोंगरे, ताजिसा कोडापे, जयंत मोरे, अनिकेत बांबोळे, वैभव रामटेके, अजय सिडाम, साहिल गोवर्धन, अजय भोपये, यश कुळमेथे, महिला सदस्या प्रफुला जुनघरे, शालू सुरपाम, गंगा सलामे, सुनीता मसराम, वनिता कोडाप, रेखा अत्राम सह वॉर्डातील इतर नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन विजय सुरपाम यांनी तर आभार रुपेश सलामे यांनी मानले.