The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑगस्ट : अखंड भारताचे दोन तुकडे झाले आणि भारत पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली. फाळणीच्या वेदना आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. त्याच वेदनांना व्यासपीठ देण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. १४ ऑगस्ट हा “विभाजन विभीषिका स्मृति दिवस” म्हणून साजरा केला जाणार असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले. ते ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था,गडचिरोली कॉम्प्लेक्स येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टि.मोर्चाचे यांनीसुद्धा संबोधित केले
यावेळी रविंद्र औलालवार संघटन जिल्हा महामंत्री, रमेशजी भुरसे कि.आ.प्रदेश सदस्य, स्वप्निल वरघंटे प्र.सदस्य, अविनाश पाल तालुकाध्यक्ष, संजय बारापात्रे जि. महामंत्री युवा मोर्चा, युवराज टेंभुर्णे एलडिएम, उदय काकपुरे मॅनेजर बँक ऑफ इंडिया तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.