– पंचायत समिती तथा ग्रामसेवक युनियन शाखा डिएनई-136 च्या वतीने रक्तदान शिबिर
The गडविश्व
गडचिरोली, ७ ऑक्टोबर : संपूर्ण देशभर जल्लोशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत राबविण्यांत येत आहे. सदर मोहिमेत हर घर तिरंगा सह विविध उपक्रमाने देशभरात एकात्मतेचे वातावरण तयार झाले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात स्वच्छता ही सेवा,सेवा पंधरवाडा,लम्पी आजार लोकजागृती तथा बुस्टर डोज लसिकरण उपक्रमांनी भर घातलेली आहे. कोरोना सदृश्य तथा सिकलसेल रुग्णांना रक्त पुरवठा लक्षात घेता भविष्यात सामाजिक दायित्वाच्या भावनेतून पंचायत समिती तथा ग्रामसेवक युनियन शाखा डिएनई-136 गडचिरोली च्या माध्यमाने निर्धार शतकपुर्ती सुमधुर संगितमय वातावरणात रक्तदान शिबिर आयोजन २९ सप्टेबर २०२२ ला पार पडले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे कुशल मार्गर्शनात व प्रेरणेनी आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार यांनी केले. तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेलार , कुतिरकर उपस्थित होते.
या शिबिरात एकुण ९३ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवित राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. सदर उपक्रमाचे प्रमाणपत्र माजी पं.स. सभापती ईचोडकर यांचे हस्ते सभागृहात रक्तदाते व सहभागी यांना वितरीत करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामसेवक युनियन अध्यक्ष बनपुरकर, सचिव शिवनकर, सहा.लेखा.अधिकारी मदनकर , विस्तार अधिकारी (पंचा.) भोयर व अन्य अधिकारी उपस्थित होते.