गडचिरोली : रानटी हत्तीच्या हल्ल्यात इसम ठार

1074

– मानव वन्यजीव संघर्ष शिगेला
The गडविश्व
गडचिरोली, ६ नोव्हेंबर : जिल्ह्यातील गडचिरोली व वडसा वनविभागात धुमाकूळ माजवणाऱ्या हत्तीच्या कळपाने एका इसमास चिरडून ठार केल्याची घटना उघडकीस आली असून हत्तीच्या हल्ल्यात जिल्ह्यात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. सदर घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. धनसिंग धरमु टेकाम रा. तलवारगड ता.कोरची असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुरुमगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या कोरची तालुक्यातील तलवारगड गाव परिसरात हत्तींच्या कळपाने शुक्रवारी रात्रोच्या सुमारास प्रवेश करत धुमाकूळ माजवला. या दरम्यान धनसिंग टेकाम यांना हत्तीने चिरडले यात त्यांचा मृत्यू झाला.
ओडिसा राज्यातून छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केलेल्या हत्तींच्या कळपाने गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातुन गोंदिया जिल्ह्यात प्रवेश करीत परत आपला मोर्चा गडचिरोली जिल्ह्यात वळवला. या दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले तर काही घरांचीही पडझड झाली. मात्र शुक्रवारी रात्रो कोरची तालुक्यातील तलवारगड गाव परिसरात हत्तीच्या कळपाने प्रवेश करीत धुमाकूळ माजवत धनसिंग टेकाम यांना चिरडले. वाघाच्या दहशतीनंतर आता पुन्हा हत्तींची दहशत नागरिकांत कायम असून मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे. सदर घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here