– मोठ्या प्रमाणात नुकसान
The गडविश्व
ता.प्र /धानोरा : तालुका मुख्यालयापासून तिन किमी अंतरावर असलेल्या लेखा येथील घरांना आग लागल्याची घटना आज ८ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत चार घर जाळून राख झाले आहे.
आज ८ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास लेखा येथील संजय कवडू लेनगुरे यांचे घरी स्वयंपाक करत असतांना लागलेल्या आगीत त्यांच्या व्यतिरिक्त इतर तीन लोकांचे घर जळून खाक झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता धानोरा नगरपंचायतचे अग्नीशमन वाहन घटनास्थळी जाऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत इतर सर्व घर जळून खाक झाली होती. आगीमध्ये घरगुती वापराचे सर्व साहित्य, राशन, मौल्यवान वस्तू जळून खाक झाले. सदर घटनेमुळे कुटुबांवर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे. या मध्ये कमीत कमी ४ ते ५ लाखापर्यंत नुकसान झालेले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत धानोरा येथील (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमान्डेड जी. डी. पंढरीनाथ 113 बटालीयन सी. आर. पी. एफ यांच्या मार्गदर्शनात मोका स्थळी राजपाल सिंह द्वितीय कमान्डेड, प्रमोद सिरसाट, निरीक्षक रत्नाप्रसाद आणी उपनिरीक्षक अनिल बनकर भेट देऊन पीडित कुटुंबाला तात्काळ जीवनावशक राशन साहित्य किटचे वाटप केले. या वेळेस लेखा येथील उपस्थित पोलीस पाटील सुरेश उसेंडी, विनोद लेनगुरे, सदुकर हलामी, ग्रामसेवक ढवळे, जगदीश राऊत देवेंद्र गुरुनुले, जनार्धन राऊत, देवजी उईके, रमेश सोनुले, रमेश मैंद, सिताराम उईके, संदीप राऊत, कबिर मोहुर्ले, तलाठी कार्यालयाचे कोडापे व इतर असंख्य महिला पुरुष उपस्थित होते. नुकसानग्रस्तांना शासनाकडुन तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात यावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे. तसेच सी. आर. पी. एफ. द्वारे वेळोवेळी अशा प्रकारची बेजिजक मद्दत करू असे आश्वासन दिले. या बद्दल गावकऱ्यांनी आभार मानले.
आगीमध्ये संजय कवडू लेनगुरे , सुरेश सिताराम मडावी, मैनाबाई सीताराम मडावी, कौशल्या विठ्ठल लेनगुरे यांच्या घराला आग लागली.