The गडविश्व
गडचिरोली : जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र कार्यालय गडचिरोली येथे महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी गडचिरोली अरविंद पेंदाम व लेखापाल माया गेडाम यांनी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण करून दिपप्रज्वलित केले व त्यांच्या स्त्रीमुक्ती बाबत जिवनकार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी गुरवळाचे क्षेत्रसहायक अरूप कन्नमवार, गडचिरोलीचे क्षेत्रसहायक श्रीकांत नवघडे, येवलीचे वनरक्षक धर्मराव दुर्गमवार इत्यादी वनकर्मचारी हजर होते. संगिता मेश्राम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.