गडचिरोली : वन्यजीवप्रेमीने दिले घोरपडीस जीवनदान

266

THE गडविश्व
गडचिरोली : शहरातील चामोर्शी मार्गावरील दिलीप गॅरेज दुकानात मागील २ ते ३ दिवसापासून घोरपड येत असल्याने दुकानातील नागरिक घाबरले होते. या बाबत वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांना माहिती देण्यात आली. लगेच वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांनी दिलीप गॅरेज गाठून शिताफीने घोरफडीला पकडले व जवळच्या जंगलात सोडून जीवनदान दिले. घोरपडीचे शिकार करणे हे कायद्याने गुन्हा असून आपल्या आसपास घोरपड आढळल्यास लगेच वन्यजीवप्रेमींना कळवावे असे आवाहन वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here