The गडविश्व
आरमोरी : बैलाच्या शोधात जंगलात गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना काल गुरुवार २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कुरंझा येथे घडली. सदर घटना रात्री उशिरा उघडकीस आली. जालमशहा गोविंदशहा सयाम (६५) रा. कुरंझा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मृतक जालमशहा हे नेहमीप्रमाणे जंगलात गुरे चारण्याकरिता गेले होते. दरम्यान सायंकाळच्या सुमारास गुरे चारून परत येत असतांना एका बैलच्या शोधात पुन्हा जंगलात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला यात ते ठार झाले.