– शिवसेना शहर प्रमुख रामकिरीत यादव व डॉ. माजी नगराध्यक्षा अश्विनी रामकिरीत यादव यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न
THE गडविश्व
गडचिरोली : शहरातील जुनी प्लॅटिनम जुबली हायस्कूल येथे २ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना वैद्यकीय मदत महायज्ञाचा तपासणी शिबिर येथे संपन्न झाला. गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आरोग्य तपासणी शिबिराचे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये राबविणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मदत कक्ष व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य महायज्ञाचे १० दिवसीय नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये शिंदे फाउंडेशन येथील औषधांचा साठा, ड्रॉप्स, चष्मे या माध्यमातून मोफत देण्यात आले. डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुद्धा मोफत करण्यात येईल. रुग्णांची शुगर तपासणी, बीपी तपासणी ,सुद्धा करण्यात आली तसेच ईसीजी करण्यात आली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सुविधेचा अभाव लक्षात घेता कार्यक्रम सगळीकडे घेऊन जिल्हा वासीयांना नवीन वर्ष आरोग्यमय लाभदायी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिबिरामध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आरोग्य महायज्ञ यातून शेकडो नागरिकांना आरोग्यविषयक नवसंजीवनी मिळाली. समाजसेवा हीच ईश्वर सेवा डॉ.अश्विनी रामकिरीत यादव या कार्यक्रमांतर्गत अनेक रुग्णांना तपासणी करून नवसंजीवनी प्रदान करण्यात आली. स्वतः एक डॉक्टर असल्याने रूग्णाबद्दलची आत्मीयता आहे आणि त्यामुळे प्रत्येक रुग्णाचे शिबिरात समाधान झाल्याने ईश्वरसेवा केल्याची अनुभुती झाली. साहेबांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम झाला व यात जवळपास ३० रुग्णाच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया कराव्या लागणार हे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा त्यांना मोफत शस्त्रक्रिया करून देण्याचा ध्यास आहे.
या आरोग्य शिबिराला वैद्यकीय डॉक्टर्स, नर्सेस तसेच शिंदे फाउंडेशन येथील सहकारी योग्य मार्गदर्शन व मदत मिळाली.
शिबिराचे उद्घाटन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व माजी नगराध्यक्षा डॉ.अश्विनी रामकिरीत यादव यांनी केले. या कार्यक्रमात सहसंपर्कप्रमुख अरविंद कात्रटवार, जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, जिल्हा विधानसभा संघटक नंदु कुमरे, संजय आकरे , युवासेना प्रमुख दीपक भारसागडे, शकुन नंदनवार, नूतन कुंभारे, जयसिंगपुरे, अनिकेत झरकर, विशाल उरकुडे, गौरव चांदेकर, सुरज ब्राह्मणवाडे, अक्षय खेवले, सार्थक खांडरे, जयंत चुधरी, प्रज्वल म्हशाखेत्री, कुमोद कोटगंले, शुभम पुन्नावार, सागर सोनटक्के, आशिष सातपुते, शरद गेडाम, साहिल कुकडे, अंकिता कुकडे, प्रिया रमावत निकिता रमावत आदी शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.