– नगर परिषदेच्या वैशिष्टयपुर्ण योजनेअंतर्गत निधी मंजूर
The गडविश्व
गडचिरोली : शहरातील कारगील चौकात कारगील युध्दात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीनिमित्त कारगिल स्मारक साकरण्यात येणार आहे. नगर परिषदेतर्फे वैशिष्टयपुर्ण योजनेअंतर्गत निधी सदर स्मारक साकारण्याकरिता मंजूर करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षापासून या स्कारकासाठी कारगील चौक दुर्गा उत्सवाचे अध्यक्ष उदय धकाते यांनी अथक परिश्रम केले आहे. त्यांच्या या परिश्रमाला यश आले आहे.
सन १९९९ मध्ये भारत-पाकिस्तान युध्द हे कारगिल क्षेत्रात झाले होते. या युध्दात अनेक भारतील शुरविर हे देशाच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान देऊन शहिद झाले. या शूरविर सैनिकांच्या स्मरणार्थ गडचिरोली शहरातील चंद्रपूर मार्गावरील चौकाला कारगील चौक हे नाव देण्यात आले. यास नगरपरिषदेने मंजुरी दिली आहे. या कारगिल चौकात दरवर्षी २६ जुलैला शहिद सैनिकांना आदरांजली देवून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.
या चौकात कारगील युध्दात शहिद सैनिकांचे स्मारक बांधण्याकरिता नगर परिषद व्यापार संकुलपुढील १०० बाय १०० फुटाची जागा देण्यात यावी अशी मागणाी नगराध्यक्षा योगिता पिपरे आणि मुख्याधिकारी वाघ, जिल्हाधिकारी संजय मीना यांच्याकडे कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांनी केली होती. तसेच या बाबत प्रशासानाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. आता या पाठपुराव्यास यश आले असून येथे ४० लाख रूपयांचे कारगील स्मारक साकारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. लवकरच येथे स्मारक तयार होणार आहे. यामुळे गडचिरोली शहराच्या सौदर्यात पुन्हा भर पडणार आहे.