गडचिरोली : ‘श्री’ च्या मुर्त्यांनी बाजारपेठ सजली

370

– शहरात आठवडी बाजार येथे एकाच ठिकाणी श्री च्या मुर्त्यांची विक्री
The गडविश्व
गडचिरोली, ३० ऑगस्ट : गणेश उत्सव एक दिवसावर येवून ठेपला असून गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने श्री च्या मुर्त्यांची विक्री एकाच ठिकाणी करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले होते. तसेच नगर परिषदेच्या वतीने मुर्ती विक्री करण्यासाठी एकाच ठिकाणी आठवडी बाजारातील गाडे उपलब्ध करूण देण्यात आले असून श्री च्या मुर्त्यांनी बाजरपेठ सजली आहे.
गणेश उत्सवानिमित्त मुर्ती खरेदी करण्याकरिता गणेश मंडळ, तसेच नागरिकांची गर्दी असते. शहरातील आठवडी बाजारात मोकळी जागा असल्याने वाहनांना पार्कींग करण्यासाठी अडचण जाणार नाही तसेच भाविकांना सुध्दा खरेदी करण्याकरिता अडचण होणार नाही. शहरात आजपासूनच आठवडी बाजार मुर्ती विक्रेत्यांनी श्री च्या मुर्ती आणल्या असून आज नागरिकांची मुर्ती घेण्याकरिता काही प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here