The गडविश्व
गडचिरोली : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,गडचिरोली या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गडचिरोली जिल्हयात सार्वजनिक न्यास नोंदणी विश्वस्त व्यवस्था १४ ते २५ मार्च 2022 या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येणार असुन ज्या संस्थेचे अवादित बदल अर्ज प्रलंबित आहे ते जास्तीत जास्त निकाली काढण्यात येणार आहे.त्यामुळे या कार्यालयाचे कार्यक्षेत्रात सर्व नोंदणीकृत संस्थांना अवादित प्रलंबित अर्ज दाखल करुन सहभाग घ्यावा व आपल्या संस्थेचा कारभार सुरळित ठेवावा. या संधीचा सर्व नोंदणीकृत संस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त गडचिरोली वि.दे.शेन्डे यांनी केले आहे.