The गडविश्व
गडचिरोली २० सप्टेंबर : जिल्हयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनाअंतर्गत ५ वा राष्ट्रीय पोषण महिना (सप्टेंबर,२०२२ )अंगणवाडी स्तरावर ०१ सप्टेंबर २०२२ पासून साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून २१ व २२ सप्टेंबर २०२२ रोजी “स्वस्थ बालक स्पर्धा” अंगणवाडी व प्रकल्प स्तरावर आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धा ५० गुणांची आहे. या स्पर्धेमध्ये प्राथमिक लाभार्थी ६ महिने ते ३ वर्षे व ३ ते ५ वर्षे वयोगटातील बालके तसेच व्दितीय लाभार्थी-काळजीवाह (पालक, कुटूंबातील इतर सदस्य, नजीक वास्तव करणारे कुटूंब) या दोन वयोगटाकरिता आयोजित करण्यात येत आहे. अंगणवाडी स्तरावरील स्पर्धेतून प्रथम दोन बालकांची सृदृढ गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
निवडीचे निकष-मासिक वाढ संनियंत्रण, बालकांची वैयक्तिक स्वच्छता, पोषण विषयक स्थिती- सातत्याने सर्वसाधारण वयोगट अथा कमी वजनाच्या बालकांतून सर्वसाधारण गटात समावेश, गरम ताजा आहाराची उपलब्धता व ३ ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची अंगणवाडीतील उपस्थिती, घरी घेऊन जाण्याचा शिधा (THR)-६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालके, नियमित लसीकरण सेवा, जंतनाशक औषध) २१ सप्टेंबर २०२२ रोजी अंगणवाडी क्षेत्रातील नोंदीत लाभार्थ्यांसाठी व २२ सप्टेंबर २०२२ रोजी अनोंदीत लाभार्थ्यांसाठी “स्वस्थ बालक स्पर्धा” आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेकरिता ६ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसमवेत पालक तथा कुटूंबातील सदस्यांनी तसेच इतर ग्रामस्थांनी अंगणवाडीस्तरावर जास्त संख्येने उपस्थित राहुन “स्वस्थ बालक स्पर्धा” हा कार्यक्रम यशस्वीरित्या होण्याकरिता ग्रामीण स्तरावरील सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली, यांनी कळविले आहे.