– हवामान विभागाने विदर्भातील जिल्ह्यांकरिता वर्तविला अंदाज
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli), २८ सप्टेंबर : २६ सप्टेंबर पासून देशभरात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. शारदा-दुर्गा उत्सव मंडळातर्फे गरबा डान्स चे आयोजन केल्या जाते यात अनेक जण सहभाग घेत असतात. मात्र यंदा घराबाहेर पडतांना हवामान विभागाने वर्तविलेल्या हवामान अंदाज जाणूनच घरा बाहेर पडावे लागणार आहे.
मागील दोन वर्षे कोरोनाने सणावर काही निर्बंध लादण्यात आले होते मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने काही निर्बंध हटविण्यात आले आहे.अशातच गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला असून २६ सप्टेंबर पासून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र या दरम्यान या उत्सवावर पाण्याचे संकट ओढवतांना दिसत असून नवरात्र उत्सवात केल्या जाणाऱ्या गरबा डान्स वर वीरजण पडण्याची शक्यता आहे. गरबा डान्स करायला घरा बाहेर पडण्याअगोदर हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाज जाणूनच घराबाहेर पडावे लागणार आहे. यंदा सरासरी पेक्षा आधीक पाऊस पडला अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती. अशातच आता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भातील जिल्ह्यांकरिता पुढील पाच दिवसांचा अंदाज वर्तविला आहे.
असा आहे पुढील पाच दिवसांचा अंदाज
#नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा पुढील पाच दिवसांचा विदर्भातील जिल्ह्यांचा जिल्हानिहाय अंदाज#Nagpur #Vidarbha #Rain2022 #Monsoon #YellowAlert pic.twitter.com/ApGuZSUO8A
— INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR (@InfoVidarbha) September 28, 2022