– घाटी येथे ग्रामपंचायत समिती पुनर्गठित
The गडविश्व
कुरखेडा : तालुक्यातील घाटी येथे बैठकीचे आयोजन करून मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती पुनर्गठित करण्यात आली. बैठकीत मागील १० वर्षांपासून असलेली गावातील दारूबंदी टिकविण्यासाठी चर्चा करण्यात आली.
यावेळी सरपंच मोहिणी गायकवाड, उपसरपंच फाल्गुन एस. फुले, ग्रापं सदस्य पंढरी मडावी, निलम भोयर, सुनिता मडावी, पोलिस पाटील सुरेश टेकाम, पेसा अध्यक्ष हरीराम कोटनाके, सहायक शिक्षक राजकुमार कोडापे, कृषिमित्र वनिता टेकाम, मुक्तिपथ तालुका उपसंघटक मयुर राऊत व प्रेरक विनोद पांडे उपस्थित होते.
यावेळी मुक्तिपथ अभियान गावस्तरीय रचनेची माहिती देण्यात आली. दारू व तंबाखूविक्री बंदी बाबत विविध कायद्याची माहिती देण्यात आली. मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती पुनर्गठित करण्यात आली. ग्रापं समितीद्वारे मुक्तिपथ गाव संघटनेला मान्यता देण्यात आली. गावात गेल्या 10 वर्षापासून दारूबंदी आहे. गावातील दारूबंदी मागील १० वर्षापासून टिकून असल्याने गावात त्याचे काय फायदे आहेत याबाबत चर्चा केली गेली. याकरिता दारूबंदी टिकवून ठेवण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच तंबाखूजन्यपदार्थ यावर आळा घालण्यासाठी कृतीचे नियोजन करण्यात आले.