-२५ रुग्णांनी घेतला लाभ
The गडविश्व
गडचिरोली : कोरची तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या साल्हे येथील व्यसनींची गरज लक्षात घेता गाव संघटनेच्या मागणीनुसार व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावातील २५ जणांनी उपचार घेतला व दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
दारूचे व्यसन हे एक मानसिक आजार आहे. यातून मुक्त होण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. व्यसनातून मुक्त होण्याची इच्छा रुग्णांनी व्यक्त केली होती. त्यानुसार गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन मुक्तिपथतर्फे सुरु असलेल्या व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन केले. यावेळी गावातील २५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. दरम्यान मुक्तिपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
सोबतच रुग्णांना समुपदेश करीत औषधोपचार करण्यात आले. रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात आदींची माहिती देत प्राजु गायकवाड यांनी रुग्णांना समुपदेशन केले. संयोजक प्रभाकर केळझरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती दिली. क्लिनिकचे नियोजन मुक्तिपथच्या तालुका संघटिका निळा किन्नाके यांनी केले. यशस्वीतेसाठी पोलिस पाटील सेरकुराम नरोटी, आशा वर्कर व गाव संघटन सदस्य पुष्पा नरोटी, अनिता सोरी, प्रशांत सोरी आदींनी सहकार्य केले.