The गडविश्व
अहेरी, ४ ऑक्टोबर : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात बातकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरातच नाही तर खेड्यापाड्यात सुद्धा या उत्सवाला अनन्य महत्व आहे. नुकतेच अहेरी तालुक्यातील ‘गेरा’ येथे पंचायत समिती अहेरीच्या माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांनी भेट देऊन बातकम्मा कार्यक्रमात सहभाग घेऊन बातकम्मा उत्सव साजरा करून महिलांशी विविध विषयावर चर्चा केली.
तेलुगु भाषिक राज्यात बातकम्मा उत्सव आनंदाने साजरा केला जातो. तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील गावातही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नवरात्र उत्सव काळात बातकम्मा उत्सव हि साजरा करण्यात येतो. अशातचा पंचायत समिती अहेरीच्या माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांनी गेरा येथील बातकम्मा उत्सावाला भेट देवून महिलांशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी सदस्यगण व समस्त गावकरी उपस्थीत होते.