The गडविश्व
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ ,च्या परीक्षा १० जून पासून ऑफलाईन MCQ OMR पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसे पत्रक विद्यापीठाद्वारे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
काल २३ मे रोजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेची सभा झाली. यावेळी १ जून २०२२ पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा परिपत्रकाद्वारे स्थगित करण्यात आले असून विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा १० जून २०२२ पासून सुरू होणार असून सदर परीक्षा ऑफलाईन MCQ OMR पद्धतीने घेण्यात येणार आहे, याबाबतचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे विद्यपीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी कळविले आहे.