The गडविश्व
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने सातदिवसीय ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा समारोप नुकताच पार पडला.
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल झेड.चिताडे, डॉ.नरेश मडावी , डॉ.सतिश गोगुलवार आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, ग्रामसभा प्रशिक्षणापासून गौण वनोपजांचे संकलन, प्रक्रिया, साठवणूक, विक्री या बाबीमुळे ग्रामसभांचा आर्थिक स्तर उंचावेल आणि त्यांच्या राहणीमानात बदल घडेल. असा अमूलाग्र बदल आपल्याला त्यांच्यात पाहायला मिळेल. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामसंभाना नक्कीच फायदा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामसभा चिपारी कृष्णा नरोटे, ग्रामसभा कुकडेल यशवंत साहारे, छाया बाई गायकवाड ग्रामसभा कसारी, ग्रामसभा येरंडी रेणुका गुरुदेव , हिड़ामी ग्रामसभा चिपरी संपतशाह गावले,आदींनी मनोगत व्यक्त केले.
संचालन आणि आभार वैभव मसराम यांनी केले.