गोंडवाना विद्यापीठाला रासेयो चा सर्वोत्कृष्ट पुरस्कार

283

– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण
The गडविश्व
गडचिरोली : “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे काल राज्यस्तरीय रा.से.यो.पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे पार पडला. शासनाचा २०२०-२१ या वर्षाकरिता ” सर्वोत्कृष्ट” विद्यापीठाचा राज्यस्तरीय पुरस्कार गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीला जाहीर झाला होता. काल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ .श्याम खंडारे यांनी हा पुरस्कार स्विकारला .
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षात निस्वार्थ भावना व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या सेवेचा गौरव व्हावा, या हेतूने १९९३- ९४ पासून पुरस्कार देण्यात येतो . राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारसीनुसार गोंडवाना विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर झाला होता. स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे .
सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्रा.डॉ नरेश मधुकर मडावी यांना देखिल पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्मृतिचिन्ह व दहा हजार रुपये रोख असा हा पुरस्कार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार गोंडवाना विद्यापीठात अंतर्गत राजुरा येथीलश्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे गुरुदास दादाजी बल्की, सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येत असलेल्या राजुरा येथील शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील महात्मा गांधी कला विज्ञान व कै. न.प.वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका शामराव ठाकरे यांना प्राप्त झाला आहे. हे सर्व पुरस्कार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार गोंडवाना विद्यापीठाला देण्यात आला, ही गोंडवाना विद्यापीठासाठी अभिमानाची बाब असल्याने शैक्षणिक क्षेत्रात पुरस्काराबद्दल कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here