– उज्वल यशाची परंपरा कायम
The गडविश्व
गडचिरोली : मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एस एस सी दहावी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे पैकीच्या पैकी विद्यार्थी उत्तीर्ण होत १०० टक्के निकाल लागला आहे. विशेष म्हणजे एकूण विद्यार्थ्यांपैकी १४ विद्यार्थी हे ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर ३० विद्यार्थ्यांनी ८५ टक्के पेक्षा अधिक गुण घेतले आहे व उर्वरित विद्यार्थी हे ७० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. विद्यालयातून मयूर राजू डाकरे याने ९५.८० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे , हरीश सुजित रॉय याने ९४.२० टक्के गुण घेत द्वितीय तर श्रेयश विनोद मामीडपल्लीवार याने ९३.८० टक्के गुण घेत विद्यालयातून तिसरा येण्याचा मान पटकाविला आहे. आकाश अनिल चोखारे ९३.६०, निखिल संजय सिडाम ९२.४०, अंकुश दीपक पिपरे ९२.४०, रोहन दिवाकर भोयर ९१.४०, सम्यक सुरेश झाडे ९१.४०, अस्मित अनिल कुनघाडकर ९१, ओम संतोष वर्मा ९०.६०, सोनल मोरेश्वर चौखे ९०.६०, मिथिलेश राजू कानकाटे याने अनुक्रमे ९०.६० टक्के गुण प्राप्त केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे सचिव धर्मरावबाबा आत्राम, अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर), मार्गदर्शक ऋतुराजजी हलगेकर , विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व वसतिगृह कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचाली करीत शुभेच्छा हि दिल्या आहेत.
