The गडविश्व
सावली : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर आणि मुंबई अर्थशास्त्र सार्वजनिक धोरण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, या शेतकरी अभ्यास व प्रशिक्षण दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौर्यात जवळपास शंभर निवडक शेतकरी सहभागी होणार असून शेतकऱ्यांच्या प्रयोगशीलतेला आणि आधुनिक शेती पद्धतीला प्रोत्साहन देणारी रुपरेषा ठरवली आहे.
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प मंडळाचे मुख्य अभियंता अशिष देवगडे ,गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता,अंकुर देसाई, मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्थेचे मुख्य प्रकल्प समन्वयक, प्रा. डॉ. सुरेश मैंद यांच्या संकल्पनेतून “शेतकरी समृद्धी अभ्यास दौऱ्याचे” आयोजन करण्यात आले आहे.
विदर्भातील, गोसेखुर्द सिंचन प्रकल्प उभारणी मुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता होत आहे. प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्याना आधुनिक शेती, प्रयोगशील शेती, बाजाराभिमुख पीक पद्धती आणि व्यापारी शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी,
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प लाभक्षेत्रातील निवडक शेतकऱ्यांचा, समृद्धी अभ्यास व प्रशिक्षण दौरा नाशिक, जळगाव जिल्ह्यामध्ये योजिला आहे. गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील लाभधारक शेतकरी जिल्हया बाहेर पडून पारंपारिक शेतीला बगल देत आधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षित आत्मसात करून उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर अत्याधुनिक शेती करण्याकरिता करतील व समृद्ध शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचे प्रयोजन आहे. या अभ्यास दौऱ्यामध्ये प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामधील राज्यात पाणी व्यवस्थापनामध्ये अग्रेसर असलेली वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था,ओझर कृषी व पाणी व्यवस्थापनात अग्रगण्य असलेली युवा मित्र फाउंडेशन सिन्नर,देशात कृषी व कृषी प्रक्रिया क्षेत्रात अग्रक्रमाने नाव असलेली सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी.नाशिक व देशात व जगात सूक्ष्म सिंचन व फळबाग संशोधनामध्ये नाव असलेली जैन इरिगेशन सिस्टम जळगाव जा ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणचे प्रकिया उद्योग,पाणी व्यवस्था,पाणी वापर संस्थाचे कार्य व जबाबदाऱ्या,फळ बाग लागवड तंत्रज्ञान,यावर वेगवेगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.या शेतकरी समृद्धी अभ्यास दौऱ्याचा प्रारंभ ९ एप्रिल २०२२ रोजी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातून पवनी, ब्रमहपुरी, सावलीया ठिकाणाहून दुपारी १. ०० वाजता मुख्य अभियंता अशिष देगडे, अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता संदीप हसे, शर्मा,.राजेश सोनोने, जितेंद्र तुरखेडे, मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्थेचे संस्थेचे सर्व अधिकारी विभागातील अधिकारी व शेतकरी यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखऊन या उपक्रमशील अभ्यास दौऱ्याचा प्रारंभ करण्यात येणार आहे.