– विविध मागण्यांकरिता ग्रापं कर्मचारी संघटनेची मा. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रोत्साहन भत्ता, राहणीमान भत्ता भविष्य निर्वाह निधी व किमान वेतनाची रक्कम मिळवून द्यावी आदी मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाटनेच्या सिरोंचा शाखे तर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन म्हंटले आहे की, कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील काही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून डिसेंबर २०२१ पर्यंतच्या कोरोना प्रोत्साहन भात्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
याबाबत संघटनेच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही न्याय मिळाले नाही. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी, किमान वेतनाचे फरकाचे रक्कम आतापर्यंत मिळालेले नाही. या मागण्यांकडे आपण जातीने लक्ष घालून तूटपंज्या वेतनावर काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावे अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
निवेदन सादर करताना संघटनेचे अध्यक्ष सिनु सिरंगी, कार्याध्यक्ष पोचम कोलगुरी, उपाध्यक्ष मालय्या अट्टेला, सचिव नागराजू गोमासी, सल्लगार सुरेश नगोडी यांच्यासहा संघटनेचे सदस्य उपस्थित होते.