– सरपंचा फालेश्वरीताई प्रदिप गेडाम यांच्या हस्ते पाणपोचा शुभारंभ
The गडविश्व
धानोरा : संपूर्ण राज्यातभरात उष्णतेने कहर केला आहे. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातीलही तापमानात वाढ झाली आहे. धानोरा तालुक्यात सध्या उष्णतेने कहर केला असून जिकडेतिकडे पाण्याची भटकंती सुरू आहे. त्यातच रांगी येथे परिसरातील नागरिक कार्यालयीन व बँक व इतर कामा करीता कोसो दूर वरून दररोज येत असतात. यादरम्यान नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी जिकडे तिकडे फिरावे लागत होते. नेमकी हीच बाब लक्षात घेवुन तहानलेल्या प्रवाशांची तहान भागवण्याकरिता रांगी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत समोर पाणपोईचा शुंभारंभ २७ एप्रिल रोजी येथिल प्रथम नागरिक सरपंचा फालेश्वरीताई प्रदिप गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले आले. यावेळी उपसरपंच नुरज हलामी, ग्राम पंचायत सदस्य दिनेश चापळे, तलाठी जवजालकर, सचिव बुराडे , मनोहर रोहनकार आदी मान्यवर व गावकरी उपस्थित होते.