– अतिदुर्गम जारावंडी येथे समिती पुनर्गठित
The गडविश्व
गडचिरोली : ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीवर मुक्तिपथ ग्रापं समितीच्या माध्यमातून लगाम लावण्याचा निर्णय जारावंडी ग्रापंने घेतला आहे.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम जारावंडी ग्रामपंचायत येथे सरपंच सपना कोडापे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिव वसंत पवार, उपसरपंच सुधाकर टेकाम, ग्रापं सदस्य दिलीप दास, जनकशहा नाहामूर्ते, सरवण वाडगुरे, साधना कोडापे, पल्लवी गेडाम, लीला नाहामूर्ते, ग्रामसभेचे शिसू नरोटे, मोतीराम मडावी व मुकेश कावळे उपस्थित होते.
यावेळी मुक्तिपथ ग्रामपंचायत स्तरीय समिती पुनर्गठन करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत गावात दारूबंदी करने, जारावंडी येथील दारू विक्रीवर लगाम लावण्यासाठी ग्रामपंचायततर्फे पोलिस स्टेशनला तक्रार देने. परिसरातील खर्रा,तंबाखू विक्री बंदीकरिता नोटीस देणे, गावात व्यसन उपचार क्लिनिक शिबिर लावणे आदी विषयांवर चर्चा करून गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.