– विविध गावातील ७१ रुग्णांवर उपचार
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑक्टोबर : गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे गावागावात व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन केले जात आहे. सध्या या शिबिरांना ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे. जांभीया, गेवर्धा, तळोधी मोकसा व कुचेर या गावातील एकूण ७१ रुग्णांवर उपचार करण्यात आला.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जांभिया येथील शिबिरात १२ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. दरम्यान, सर्चचे उपसंचालक तुषार खोरगडे यांनी शिबिराला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. रुग्णाची केस हिस्ट्री संयोजिका पूजा येलूरकर तर रुग्णाचे समुपदेशन साईनाथ मोहूर्ले यांनी केले. नियोजन व व्यवस्थापन मुक्तीपथ तालुका संघटक किशोर मलेवार, तालुका प्रेरक रवींद्र वैरागडे व स्पार्क कार्यकर्ती रुणाली कुमोटी यांनी केले. यशस्वीतेसाठी मुक्तीपथ गाव संघटन सदस्य व गाव पाटील लुला हीचामी, भूमया राजू हीचामी, शशिकांत तोरे, बंडू पुंगाटी, आशा वर्कर लिमी तोरे, संगीता गावडे, इलाखा सचिव मंगेश नवडी यांनी सहकार्य केले. कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील शिबिराला २० रुग्णांनी भेट दिली. रुग्णांचे समुपदेशन प्राजु गायकवाड व केस हिस्ट्री प्रभाकर केळझळकर व कान्होपात्रा राऊत यांनी घेतली. यावेळी सरपंच सुनीता मडावी, ग्रापं सदस्य रोशन सय्यद, तंमुस अध्यक्ष राजू बारई, गावसंघटना अध्यक्ष व पोलीस पाटील भाग्यरेखा वझाडे, सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन आडे उपस्थित होते.
चामोर्शी तालुक्यातील तळोधी मो येथे आयोजित शिबिराचा एकूण २६ रुग्णांनी लाभ घेतला. रुग्णांची केस हिस्ट्री प्राजक्ता मेश्राम व समुपदेशन छत्रपती घवघवे यांनी केले. शिबिराचे नियोजन तालुका उपसंघटक आनंद सिडाम व प्रियंका भूरले यांनी केले. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कुचेर येथील शिबिरात १३ रुग्णांनी उपचार घेतला. समुपदेशक साईनाथ मोहूर्ले यांनी रुग्णांची तपासणी व धोक्याचे घटक सांगितले. संयोजिका पूजा येल्लुरकर यांनी दारूचे दुष्परिणाम समजावून सांगितले. यावेळी गाव पाटील सत्तु हेडो, राजू गावडे, लेबडू हेडो उपस्थित होते. शिबिराचे नियोजन आबिद शेख व विद्या पुंगाटी यांनी केले.