– जि.प.अध्यक्षांनी शाल व श्रीफळ देवून केले सत्कार
The गडविश्व
अहेरी : माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे निकटवर्तीय माजी जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट यांचे खंदे समर्थक चंद्रु मूलकरी यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला राम राम करीत आविस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांनी ल व श्रीफळ देवून त्याचा सत्कार केला.
अहेरी तालुक्यांतील पेठा ग्राम पंचायतचे ग्राम पंचायत सदस्य चंद्रु मूलकरी हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामधून निवडून आले होते. माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे निकट वर्तीय माजी जिल्हा परिषद सदस्य ऋर्षी पोरतेट यांचे ते खंदे समर्थक होत. त्यांनी आविस मध्ये प्रवेश केल्याने आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडनुकीत राष्ट्रवादीला जिम्मलगटटा-पेठा क्षेत्रात मोठा धक्का बसणार आहे.
आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी हा आविस मध्ये प्रवेश केला.
जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या अहेरी येथील जन संपर्क कार्यालयात सदर प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला.
\यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके, कोंजेड ग्राम पंचायतचे माजी सरपंच वंंजा मडावी, ग्राम पंचायत सदस्य भीमराव मडावी, जयराम आत्राम, आनंद जियाला, राकेश सडमेक, प्रशांत गोडशेलवार, सुद्दामा हलदर, अरफज शेख, कार्तिक तोगम, विपुल गरगाम, प्रकाश दुर्गे, आदि उपस्थित होते.