THE गडविश्व
चंद्रपूर : जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे पत्नीची कुऱ्हाडीने वार जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना काल ८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. योगिता राजू बावणे वय (वय 35) असे मृतक पत्नीचे नाव असून राजू बावणे अंदाजे वय ४२ असे आरोपी पतीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, काल रात्रोच्या सुमारास पती-पत्नीत वाद झाला. वादानंतर पत्नीला विजेचा धक्का देऊन सुद्धा मारण्याचा प्रयत्न पतीने केला. त्यानंतर कुऱ्हाडीने वार करून पत्नीला जागीच ठार केले. या घटनेनंतर पतीने आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केल्याचे बोलल्या जात आहे. आरोपी पती राजू बावणे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे . मृत योगिता राजू बावणे यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून, ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.