The गडविश्व
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभिड तालुक्यात कृषी विभागांतर्गत एका शेतकऱ्याव्यतिरिक्त सर्व शेतकऱ्यांना शेततळी व बोडीचे अनुदान मागणीनुसार वाटप करण्यात आले असून शेतकरी मारोती वाजुरकर यांचे अनुदान द्यावयाचे राहिले असून याही शेतकऱ्याची रक्कम 31 मार्च 2022 पूर्वी देण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री रामदास आंबटकर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला होता.
#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभिड तालुक्यात कृषी विभागांतर्गत एका शेतकऱ्याव्यतिरिक्त इतर सर्व शेतकऱ्यांना शेततळी व बोडीचे अनुदान मागणीनुसार वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती रोजगार हमी मंत्री @SandipanBhumare यांनी दिली.— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 21, 2022