The गडविश्व
गडचिरोली : आजपासून चंद्रपूर येथे सुरु होणाऱ्या दोन दिवसीय वरिष्ठ गटातील मुला व मुलींच्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेकरीता गडचिरोली संघ रवाना झाला आहे.
वरिष्ठ गटातील मुला व मुलींच्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत गडचिरोली बॉक्सिंग केंद्राच्या खेळाडूंची निवड झाली आहे त्यात मुलानं मध्ये अनिकेत नैताम ४८ किलो, जयेश गाढवे ५४ किलो, अक्षयकुमार कोवासे ५७ किलो, मनीश जेट्टी ६० किलो, भोजराज अनपत्रावार ६४ किलो, दिपक वरखडे ६७ किलो, लकी साखरे ७१ किलो, पारस राऊत ९१+तर मुलींन मध्ये दिव्या डोरले ४८ किलो, कल्याणी महागणकर ४८ किलो, यशश्री साखरे ७५ किलो वजन गटात निवड करण्यात आली आहे.
सदर खेळाडूंना या स्पर्धेसाठी गडचिरोली बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जगदीश मस्के, सचिव यशवंत कुरुडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, कुस्ती प्रशिक्षक बडगेवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सदर खेळाडू गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे नियमित खेळाडू असून त्यांना बॉक्सिंग प्रशिक्षक महेश निलेकार, पंकज मडावी, संतोष गैनवार, निखिल इंगडे यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना प्रवीण मेश्राम, संजय मानकर, तसेच गडचिरोली बॉक्सिंग परिवाराने त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.