– परिसरात वाघाचा धुमाकुळ
The गडविश्व
चंद्रपूर : येथील औष्णिक वीज केंद्र परिसात काल बुधवारी रात्रो 10.30 वाजताच्या सुमारास वाघाने कामगारावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. भोजराज मेश्राम (५८) रा. वैद्यनगर तुकुम असे त्या कामगाराचे नाव आहे.
चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र परिसरात वाघाचा वावर आहे. या दोन दिवसांपुर्वी औष्णिक वीज केंद्राच्या गेट समोर वाघ वावरत असल्याचे विडीओ समाजमाध्यमांवर वायरल झाले होते. काल भोजराज मेश्राम हे नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून घरी परतत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना इतर ठिकाणी फरफटत नेले यात त्यांचा जगीच मृत्यू झाल्याचे कळते. आज सकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यूदेह मिळाला. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावर निर्माण झाले आहे.