चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात पार पडली डिजिटल कार्यशाळा

324

– डिजिटल मीडिया विषयी मार्गदर्शन
The गडविश्व
चंद्रपूर : डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॅानिक मीडियासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. डिजिटल मीडिया या नव्या माध्यामातील नवीन माहिती जाणून घेण्यासाठी डिजिटल मीडिया म्हणजे नक्की काय ? हे जाणून घेण्यासाठी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ भवनात २६ जून रोजी डिजिटल मीडियाची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी डिजिटल मीडियातील अभ्यासक, पत्रकार तथा डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कॉन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य देवनाथ गंडाटे यांनी मार्गदर्शन केले.
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत अध्यक्ष मजझर अली, सचिव बाळू रामटेके, कोषाध्यक्ष प्रवीण बतकी, वरिष्ठ पत्रकार आशिष आंबाडे, प्रशांत विघ्नेश्वर, डिजिल मीडिया असोशिएशनचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापण, पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य, विविध वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना रोजगार उपलब्ध आहे. ही संधी गाठण्यासाठी डिजिटल मीडिया नक्की काय आहे, याची तोंडओळख करुन देण्यासाठी भविष्यातील पत्रकारितेवर आधारित कार्यशाळा घेण्यात आली. गूगल आणि जीमेलचे बहूफायदे, फेसबुक आणि ट्विटरमधील फरक, व्हाट्सएप आणि टेलिग्राम, बिझनेस व्हाट्सएप काय आहे ?, नव्या पत्रकारितेत महत्वाचे एप, ऑनलाईन कमाईची साधने यावेळी समजावून सांगण्यात आली. मागील ५-६ वर्षांपासून न्यूज पोर्टलच्या माध्यमातून पत्रकारिता रूढ झाली असताना आता मागील २ वर्षापासून लोकल शॉर्ट व्हिडीओ जर्नालिझम सुरु झाली आहे. त्यात नवीन पत्रकारांना भविष्य असल्याचे यावेळी देवनाथ गंडाटे यांनी सांगितले. यावेळी सहभागींनी विचारलेल्या शंका आणि विविध प्रश्नांचे निरसरण करण्यात आले.
सचिव प्रशांत विघेश्वर यांनी प्रास्ताविक केले, तर आभार बाळू रामटेके यांनी मानले. यावेळी ग्रामीण भागातील पत्रकार बंधूंची उपस्थिती महत्वाची ठरली. आयोजनासाठी राजेश निचकोल, धम्मशिल शेंडे, रोशन वाकडे, देवानंद साखरकर, सुनील बोकडे यांनी सहकार्य केले.
कार्यशाळेत हैदर शेख, जितेंद्र जोगड, अनिल देठे, प्रकाश देवगडे, कमलेश सातपुते, विकास मोरेवार, भोजराज गोवर्धन, मंगेश पोटवार सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here