The गडविश्व
गडचिरोली : नजीकच्या ग्रामपंचायत चांदाळा येथे स्थानिक स्थानिक फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन कार्यक्रम गुरुवार १० मार्च २०२२ रोजी घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायतराज ट्रेनर पुनम झाडे, ग्रामपंचायत चांदाळाच्या सरपंचा तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महिलांना महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अवंती वाटे तर आभार पल्लवी मंगर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथील महाविद्यालयाचे एम.एस.डब्ल्यू भाग- २ च्या विद्यार्थिनी स्वाती आभारे, करीना उसेंडी व विद्यार्थी अक्षय तिवाडे यांनी सहकार्य केले.