चामोर्शी तालुक्यातील १०३ रुग्ण व्यसनमुक्त होणार

337

– तालुक्यातील विविध गावात शिबीर
The गडविश्व
चामोर्शी, ११ जुलै : तालुक्यातील विविध गावांतील व्यसनी रुग्णांची उपचाराची गरज लक्षात घेता, गाव संघटनेच्या मागणीनुसार वेलतूर तुकूम, बामनपेठ, निमडर टोला, लखमापूर बोरी, कर्दुळ टोला या गावांमध्ये गाव पातळी व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, व्यसनातून मुक्त होण्यासाठी एकूण १०३ रुग्णांनी उपचार घेतला आहे.
ग्रामीण व शहरी भागात दारूचे व्यसनी असून वेळेवर उपचार मिळणे गरजेचे आहे. मोठ्या शहरांमध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना हे महागडे उपचार घेणे न परवडणारे आहे. ही बाब हेरून मुक्तिपथ अभियानाने शहरात तालुका क्लिनिक व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी गाव पातळी व्यसन उपचार शिबीर घेण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. गाव संघटना किंवा गावकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हाभरातील विविध गावांमध्ये शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
चामोर्शी तालुक्यातील वेलगुर तुकूम येथील शिबिरात २२ रुग्णांनी उपचार घेतला. यासाठी ग्रापं सदस्य संजय चौधरी, पोलिस पाटील मुकुंदा सूरकर, खुशाल झरकर, टीकाराम धोटे, प्रमोद कुलसंगे, तुळशीराम झाडे, संतोष नामबनकर, विकास धानोरकर यांनी सहकार्य केले. बामनपेठ येथे आयोजित शिबिराच्या माध्यमातून एकूण २१ रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आला. या शिबिरासाठी प्रभाकर कन्नाके, पोलिस पाटील भाऊजी सिडाम, संघटना अध्यक्षस गीता सिडाम, ललिता मडावी, रघुनाथ कन्नाके, बंडू कन्नाके, राजू तलांडे, दामोधर आत्राम यांनी सहकार्य केले. निमडर टोला येथील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २६ रुग्णांनी उपचार घेतला. या उपक्रमासाठी गाव संघटना अध्यक्ष नीता निमरड, नीती पाटील, रंजना शिंदे, संजू मेडपल्लीवार, विजय निमरड, सुरेश रोहणकर, मारोती गद्दे, आबाजी येलमुले यांनी विशेष परिश्रम घेतले.
लखमापूर बोरी गाव संघटनेच्या मागणीनुसार आयोजित शिबिराचा एकूण १३ रुग्णांनी लाभ घेतला. गाव संघटनेच्या अध्यक्ष सुमित्रा सातपुते, दिलखुश बोदलकर, शंकर बारसागडे, महादेव मोगरकर यांच्या परिश्रमातून शिबीर यशस्वी झाले. कर्दुळ टोला येथील शिबिराचा एकूण २१ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी गाव संघटनेचे अध्यक्ष संगीता सातपुते, अश्विनी पालीकोंडावार, पोलिस पाटील चलाख, दिलीप मोहुर्ले, सुरेश बोमकंटीवार, प्रकाश शेंडे, मलकेश गुरनुले, अविनाश वसाके रमेश चलाख यांनी सहकार्य केले.
वेलतूर तुकूम २२, बामनपेठ २१, निमडर टोला २६, लखमापूर बोरी १३, कर्दुळ टोला २१ अशा एकूण १०३ रुग्णांनी व्यसन उपचार शिबिराचा लाभ घेतला. शिबीरांचे नियोजन तालुका संघटक आनंद इंगळे व उपसंघटक आनंद सिडाम यांनी केले. या उपक्रमात सहभागी रुग्णांची केस हिष्ट्री संयोजक छत्रपती घवघवे यांनी घेतली. तसेच अरुण भोसले यांनी रुग्णांचे समुपदेश केले. रुग्णांना दारूचे दुष्परिणाम, धोक्याचे घटक आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here